ऋणनिर्देश

   सामाजिक एकोपा, जनजागृती आणि प्रबोधन असे व्यापक उध्दीष्ठ डोळ्यासमोर ठेवून मा.धर्मवीर श्रीमंत श्री. आनंद दिघे साहेब यांनी टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवास प्रारंभ केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव चालू राहिला व अल्पावधितच तो भक्तांचे श्रध्दास्थान म्हणून गणला जावु लागला. आज ही त्यांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत या उत्सवाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
   ठाण्यातील विविध राजकिय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रामधील नामवंत व्यक्ती आणि समस्त ठाणेकर नागरीक यांच्या मोलाच्या सहकार्यानेच ही वाटचाल सुरु आहे. कोणतेही कार्य उभे राहण्यास आणि सातत्याने चालु राहण्यास लोकांचा सहभाग आणि आर्थिक सहकार्य या दोन गोष्टी अत्यंत मोलाच्या असतात. आजपर्यंत या उत्सवासाठी या दोन गोष्टींची कधीही उणीव भासली नाही. ठाणेकर नागरीक आणि दानशूर व्यक्ती ह्यांनी सदैव मदतीचा हात पुढे केला आहे.
   उत्सव सुरु करताना एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीत मा. धर्मवीर श्रीमंत श्री. आनंद दिघे साहेब, श्री.वल्लभभाई मजेठीया, श्री.भालचंद्र घुले, श्री.दिलीप देहरकर, श्री.उत्तम सोलंकी, श्री.रमेश परमार, श्री.भुरमल जैन, कै.विजू नाटेकर, कै.रवि सुर्वे, कै.वसंत धारवे, कै.बाबुलाल जैन या सर्व सन्मानीय सदस्यांबरोबरच व्यापार्‍यांचे प्रतिनिधी कै.हरीभाई बारोट ह्यांचे महत्वपूर्ण योगदान वेळोवेळी मिळत राहिले.
   पहिल्या वर्षी देवीची प्राणप्रतिष्ठा ज्या जागेवर करण्यात आली ती जागा त्या जागेचे मालक कै.श्री.वसंतजी पुरोषोत्तम ठक्कर यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ संस्थेस दिली. त्या जागेवर भावी काळात देवी मातेचे मंदीर बांधण्याचा संस्थेचा मानस आहे.
   उत्सवाच्या अगदी प्रारंभीच्या काळात टेंभी नाका परिसरातील स्थानिक रहिवासी आणि उत्साही कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत व ३३ वर्षाच्या अखंड वाटचालीत त्यांचे जे सातत्याने सहकार्य मिळत आहे त्याचे मोल करता येणार नाही.
    या नवरात्रोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे देवीची मुर्ती. ही मुर्ती खरोखरच सर्वार्थाने वैशिष्ठ्यपूर्ण आहे. ही मुर्ती घडविणारे मुर्तीकार श्री.पुंडलीक शिळकर, श्री.किरण शिळकर व समस्त शिळकर परिवाराचा मोलाचा वाटा आहे.
    देवीची प्राणप्रतिष्ठा व सर्व धार्मिकविधी ठाण्यातील सुप्रसिध्द पेशवेकालिन कौपिनेश्वर मंदिरातील पुरोहीत कै.श्री.गणेशमहाराज प्रारंभीपासुन २० वर्षे करीत होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पट्टशिष्य श्री.गिरीषमहाराज हे देवीची प्राणप्रतिष्ठा व सर्व धार्मिकविधी करीत आहेत.
    नवरात्रोत्सवाच्या आयोजनात ठाणे महानगर पालिका, मा.महापौर, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे दरवर्षी मिळणारे सहकार्य महत्वाचे असते. या उत्सवास दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. उत्सव शांतपणे पार पडावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे पोलीस दलाचे मोलाचे सहकार्य प्राप्त होत असते. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून या उत्सवासाठी अखंडीत विद्युत पुरवठा केला जातो.
    नवरात्रोत्सवाच्या मंडप सजावटीचे काम सुरवातीच्या काळात ठाण्यातील कासमब्रदर्स हे पाहात होते. नंतर पुण्यातील अशोक इलेक्ट्रीकल्स हे मंडपाचे व कै.श्री.अप्पा कुलकर्णी हे सजावटीचे काम पाहात असत. सध्या पुण्यातीलच श्री.बी.एस.कातुरे हे मंडपाचे व श्री.विनय खटावकर हे सजावटीचे काम करतात. तसेच पुण्यातील सुप्रसिध्द श्रीमंत दगडूशेट हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष मा.श्री.प्रतापराव गोडसे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन या उत्सवास मिळत आहे. उत्सवाच्या काळात परिसरातील विद्युत रोषणाई इंदोरचे श्री.समरथमल जैन हे सुरवाती पासुन करत आहेत.
    या उत्सवाच्या भुमीपुजना पासुन ते कोजागिरी पोर्णिमेच्या शांतीपाठ व महाभंडारा पर्यंतच्या प्रवासातील देवीचे, उत्सवाचे व उत्सवास भेट देणार्‍या मान्यवरांची छायाचित्रे व छायाचित्रण अतिशय आकर्षक आणि सफाईने काढणारे छायाचित्रकार श्री.शिरीष साने, श्री.आनंद विशे, श्री.प्रविण देशपांडे व श्री.निलेश मेहता हे आज पर्यंत करीत आहेत.

या सर्वांचे ही संस्था शतशः ऋणी आहे.

विशेष आभार
टेंभी नाका मित्र मंडळ,ठाणे.
धोबी आळी मित्र मंडळ,ठाणे.
काबाड आळी मित्र मंडळ,ठाणे.
तेली गल्ली मित्र मंडळ,ठाणे.
जोशी वाडा मित्र मंडळ,ठाणे.
मा.आमदार एकनाथ शिंदे. मा.आमदार श्री.राजन विचारे.
जय भवानी जय अंबे !
कॉपीराइट © २०११ श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था, भवानी चौक, टेंभी नाका, ठाणे, नवरात्री उत्सव.सर्वाधिकार सुरक्षित.
Powered by Neologic Software Solutions